झारखंड सिमडेगा येथे ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय
अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ राजस्थानशी
भिडणार तर मुलांच्या संघाचा सामना
ओडिशाविरुद्ध रंगणार
सिमडेगा, झारखंड, दि. १ ऑक्टोबर, पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या
३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व
किशोरी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व
सामन्यात, महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने विदर्भ संघावर १
डाव आणि २० गुणांच्या फरकाने विजय मिळवला. महाराष्ट्राच्या सिद्धी भोसलेने ३.००
मी., वेदिका कामखेडेने २.०० व १.३० मी. संरक्षण करताना १ गडी
बाद केला. श्रावणी तामखेडेने दोन्ही डावात अनुक्रमे २.०० मी. व १.४० मी. नाबाद
संरक्षण करताना ३ गडी बाद केले. गौरी यादव आणि ईश्वरी सुतारने प्रत्येकी ३ गडी बाद
केले. तर विदर्भ संघाकडून दुर्गा गवताडेने १.३० मी. संरक्षण करताना १ गडी बाद
केला.
मुलींच्या इतर सामन्यात राजस्थानने पंजाबवर ६ गुणांनी विजय मिळवत उपांत्य
फेरीत प्रवेश केला. कर्नाटकने छत्तीसगडवर २ गुणांनी निसटता विजय मिळाला.
तामिळनाडूने पश्चिम बंगालवर २ गुणांनी विजय संपादन केला. तामिळनाडू आणि कर्नाटक
यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात, महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने पश्चिम बंगालचा २८ गुणांनी धुव्वा उडवत
उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या प्रसाद बेलीपने पहिल्या डावात ३.३०
मी. संरक्षण व विनायक भांगेने २.२० मी. संरक्षण केले. भीमसिंग वसावेने १.३० मी. व
१.४० मी. संरक्षणाची वेळ दिली णि आक्रमणात ५ गडी बाद केले. सुयश चव्हाणने ६ तर
मयूर जाधवने ३ गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात तेलंगणाने आंध्र प्रदेशला पराभूत केले, तर ओडिशाने कर्नाटकवर विजय मिळवला आणि
तेलंगणाने दिल्लीचा पराभव केला.
Post a Comment
0 Comments