गतविजेता पार्क क्लब ‘अ’ उप-उपांत्यपूर्व फेरीत
मुंबई,: गतविजेता पार्क क्लब 'अ (पीसीएल बीच बॉईज) बीएसएएम आयोजित बीएसएएम सीसीआय केकू निकोल्सन बिलियर्ड्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला असून पहिल्या फेरीच्या सामन्यात त्यांची गाठ
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया 'अ' (सीसीआय बिलियर्ड्स बॉईज) टीमशी पडेल.
मुंबई बिलियर्ड्स लीगला क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये बुधवारपासून सुरुवात होणार असून पीसीएल बीच बॉईज हा ग्रुप ए मधून तिसरा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून पात्र ठरला आहे. सीसीआय बिलियर्ड्स बॉईजनी ग्रुप इ मध्ये अव्वल राहून अंतिम 16 टीममध्ये स्थान मिळवले.
दरम्यान, पार्क क्लब ‘बी’ संघाने (पीसीएल बीच बॉईज) ग्रुप बीमध्ये प्रथम क्रमांक पटकावताना बाद फेरीत प्रवेश केला.
पी. जे. हिंदू जिमखाना ‘ए’ टीम (पीजेएचजी क्यू रेंजर्स) आणि ‘बी’ टीम (पीजेएचजी प्रोटेज) बाद फेरीसाठी पात्र ठरले. पीजेएचजी क्यू रेंजर्सने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावले तर पीजेएचजी प्रोटेजने ग्रुप सी मध्ये इस्लाम जिमखाना टीमला (आयजी कॅनन्स) मागे टाकत दुसरे स्थान पटकावले.
उप-उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले इतर संघ -सांताक्रूझ क्लब (सांताक्रूझ सनरायझर्स), विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना (डब्ल्यूसीजी विझार्ड्स), मलबार हिल क्लब (मलबार मटकास), चेंबूर जिमखाना (सीजी ग्लॅडिएटर्स) कॅथलिक जिमखाना (सीजी फॅन्टास्टिक फोर), शिवाजी पार्क जिमखाना (एसपीजी जेंटलमन), एल्फिन्स्टन सीसी (ईसीसी एल्फिज स्टार्स), मंडपेश्वर सिव्हिक फाउंडेशन (एमसीएफ टफ मेन), खार जिमखाना (केजी स्लो एन स्टेडी) आणि बॉम्बे जिमखाना (बीजी फँटम).
Post a Comment
0 Comments