अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा;
नवी मुंबई एसए, वाशी केंद्राला विजेतेपद
ससानियन एससीवर पहिल्या डावाच्या आघाडीवर मात
वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने वरळी स्पोर्ट्स क्लब मैदान, वरळी येथे झालेल्या दोन दिवसीय लढतीच्या दुसर्या दिवशी नवी मुंबई एसए, वाशी केंद्राचा डाव 77.5 षटकात 252 धावांवर संपला. त्यात प्रज्ञा भालेराव (96 धावा), स्पर्श घोलप (34 धावा) आणि पुगझ सुंदराजचे (31 धावा) महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ससानियन एससीकडून वेदांग कोकाटे (3/32) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
ससानियन एससीने पहिल्या डावात 235 धावांची मजल मारली होती. दुसर्या दिवसअखेर बुधवारी त्यांनी 3 षटकांत 1 बाद 24 धावा केल्या. नवी मुंबई एसएने ससानियन एससीवर पहिल्या डावात 17 धावांची छोटेखानी परंतु, महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. याच आघाडीच्या बळावर त्यांनी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक - अंतिम फेरी: ससानियन एससी, आझाद मैदान केंद्र -पहिला डाव 67.5 षटकांत सर्वबाद 235(धैर्य पाटील 38, आरुष कोल्हे 38, वेदांग कोकाटे 34, अर्शियान शेख 29, सत्यनारायण घुगे 21; गणेश धनावडे 4/44, उदय सिंग जोहल 3/55), प्रज्ञा भालेराव 2/25) आणि 1 बाद 24. वि. नवी मुंबई एसए, वाशी केंद्र - 77.5 षटकांत सर्वबाद 252(प्रज्ञा भालेराव 96, स्पर्श घोलप 34 धावा, पुगझ सुंदराज 31; वेदांग कोकाटे 3/32). निकाल नवी मुंबई एसए, वाशी केंद्र पहिल्या डावाच्या आघाडीवर
विजयी.
Post a Comment
0 Comments