एमसीए अजित नाईक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
गणेश धनावडेने (4/44) आझाद मैदान केंद्राला 235 धावांवर रोखले
मुंबई, : मध्यमगती गोलंदाज गणेश धनावडेच्या (44 धावांत 4 विकेट) अचूक मार्याच्या जोरावर नवी मुंबई एसए, वाशी केंद्राने ससानियन एससी, आझाद मैदान केंद्राला 27व्या एमसीए अजित नाईक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय अंतिम फेरीत पहिल्या दिवशी 67.5 षटकांत सर्वबाद 235 धावांत रोखले.
वरळी स्पोर्ट्स क्लबने आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने वरळी स्पोर्ट्स क्लब मैदान, वरळी येथे सुरू असलेल्या सामन्यात मंगळवारी प्रथम फलंदाजी करणार्या आझाद मैदान केंद्राने आश्वासक सुरुवात करताना 1 बाद 68 धावा केल्या होत्या. मात्र, तीन झटपट विकेट गमावल्याने पुढील 15 षटकांत केवळ 6 धावा निघाल्या. पण
सलामीवीर धैर्य पाटीलसह 38 धावा (49 चेंडू, 6 चौकार), मधल्या फळीतील फलंदाज आरुष कोल्हे (38 धावा, 56 चेंडू, 6 चौकार), वेदांग कोकाटे (34 धावा, 57 चौकार, 3 चौकार), अर्शियान शेख (29 धावा, 25 चेंडू, 4 चौकार), सत्यनारायण
घुगे (21 धावा) आणि सूरजप्रकाश शहाने (20 धावा) दमदार खेळी करताना संघाला दोनशेपार नेले वाशी केंद्राचा मध्यमगतीगोलंदाज गणेश धनावडेने 44 धावांत 4 विकेट घेत छाप पाडली. ऑफस्पिनर उदय जोहलने 55 धावांत 3 आणि वेगवान गोलंदाज प्रज्ञा भालेरावने 25 धावांत 2 विकेट घेतल्या.
पहिल्या दिवसअखेर मंगळवारी वाशी केंद्राने 4 षटकांत बिनबाद 10 धावा केल्या. पहिल्या डावात महत्त्वाची आघाडी मिळविण्यासाठी त्यांना आणखी 225 धावा करायच्या आहेत.
संक्षिप्त धावफलक - अंतिम फेरी: ससानियन एससी, आझाद मैदान केंद्र - 67.5 षटकांत सर्वबाद 235(धैर्य पाटील 38 (49 चेंडू, 6 चौकार), आरुष कोल्हे 38 (56 चेंडू, 6 चौकार), वेदांग कोकाटे 34 (57 चेंडू, 3 चौकार) , अर्शियान शेख 29 (25 चेंडू,4 चौकार), सत्यनारायण घुगे 21; गणेश धनावडे 4/44, उदय जोहल 3/55), प्रज्ञा भालेराव 2/25) वि. नवी मुंबई एसए, वाशी केंद्र - 4 षटकांत बिनबाद 10.
Post a Comment
0 Comments