Type Here to Get Search Results !

इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धा भारतीय पुरुष संघ इंग्लंड व श्रीलंके कडून पराभूत

 


इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघ इंग्लंड व श्रीलंके कडून पराभूत

कोलंबो, १६ एप्रिल, (क्री. प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून आज भारतीय संघाला इंग्लंड कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील.   

 

आज झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल इंग्लंडने जोरदार हल्ला करत ११२ धावा करून भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जायला भाग पाडले. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने (१९ धावा केल्या) तर दैविक रायने (१८ धावा व १ बळी) यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली होती. तर इंग्लंडच्या नव पटेल (२३ धावा), टॉम क्लार्क ( १६ धावा १ बळी), ऑलीव ग्रीन (१५ धावा २ बळी) यांनी मोठा विजय मिळवून दिला.

 

तर श्रीलंकेविरुध्द झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यातसुध्दा भारताला लागोपाठ पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला १०३ धावात रोखले. तर भारताने अतिशय अतितातीच्या खेळात ९२ धावा करत जोरदार लढत दिली. या सामन्यात धनुष भास्करला (१६ धावा २ बळी) सामनावीर पुरस्कार देऊन गौरविले. विजय गौडा (१६ धावा १ बळी) व अफरोज पाशा (२० धावा) यांनी जोरदार खेळी केली तर श्रीलंकेच्या दिलसारा सासंका (१६ धावा १ गुण), चंडीमा आबेयून (१७ धावा १ बळी), विनुदा लियानगे व शेवोन फोनसेका (प्रत्येकी १८ धावा व १ बळी) यांनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला.      


Post a Comment

0 Comments